Breaking News

राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही

मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांना ठणकावून सांगत म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसी बॅरिकेड्स लावून प्रयत्न केलात. पण जनतेने या यात्रेचे स्वागतच केले. आता माझ्या विरोधात ५० गुन्हे दाखल केलात आणखी ५० गुन्हे दाखल करा मला काहीही फरक पडत नाही. मी घाबरणाऱ्यातील नाही असे ठणकावून आसाम मुख्यमंत्री सरमा यांना सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री कोण असेल तर आसामचा मुख्यमंत्री असून या मुख्यमंत्र्याचा रिमोट कंट्रोल दिल्लीतील त्याच्या नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळे ते जसे सांगतील तसे तो वागत आहे. पण त्याला अशी काय दुर्बध्दी सुचली की राहुल गांधी अर्थात मला तो घाबरवू शकतो आणि थांबवू शकतो. आतापर्यंत मला थांबविण्यासाठी आणि घाबरविण्यासाठी ५० गुन्हे त्याने दाखल केले आहेत. पण मी घाबरणाऱ्यातील नाही त्यामुळे तुम्ही आणखी ५० गुन्हे दाखल करा असे थेट आव्हान देत मी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला भीत नाही असा इशाराही दिला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी संसदेत बोलताना नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांच्या विरोधात बोललो. त्यावेळी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करत माझी खासदारकी रद्द केली. माझे सरकारी निवासस्थान काढून घेतले. त्यावेळी मी स्वतः त्या घराची चावी संबधित अधिकाऱ्याला बोलावून दिली. त्यावेळी सांगितले की, हे माझे घर नाही. हे घर तर सरकारी आहे. पण माझे खरे घर कोठे आहे तुम्हाला माहित आहे असा सवाल उपस्थित समुदायाला करत माझे घर इथल्या तमाम आसामवासियांच्या, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि देशातील अनेक नागरिकांच्या हृदयात असून इतके मोठे घर कोणाचेच नाही. पण आसामचे मुख्यमंत्री घाबरलेले असल्यानेच आपल्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत असा आरोपही केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *