Breaking News

गोपीनाथ मुंडे हत्याप्रकरणी पंकजा मुंडे यांचे मौन

मंत्रिमंडळ बैठकीला ही गैरहजेरी

मुंबई: प्रतिनिधी 

ईव्हीएम मशिन्स हँकींगबाबतची माहिती भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांना असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद सुजी यांने लंडन येथील पत्रकार परिषदेत काल सोमवारी केला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बाल कल्याण आणि  ग्रामविकास मंत्री पदी असलेल्या मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या असल्याने या गौप्यस्फोटावर त्या काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले. परंतु त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य करण्याऐवजी त्यांनी शांत राहणेच पसंत केले.

 दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा गौप्यस्फोट केल्यांनतर देशभरात खळबळ उडाली. मात्र याप्रकरणी मुंडे यांच्या कन्या पंकजाने मुंडे यांनी मौन बाळगले. तसेच त्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ही  दांडी मारली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी सुजीने केलेल्या आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असताना पंकजा मुंडे यांनी मात्र अतिशय सावध पवित्र घेतला आहे. 

याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अनेकवेळा मंत्र्यांना त्यांच्या मतदार संघातही कामे असतात. तसेच त्यांच्या विभागाच्या कार्यक्रमांसाठीही बाहेर जावे लागते. त्यामुळे मंत्र्यांना हजर राहता येत येत नाही. पंकजा मुंडे यांनीही परवानगी घेऊनच गैरहजर राहिल्या असल्याचे स्पष्ट केले.

सुजी याने केलेल्या या गौप्यस्फोटाने भाजपच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली असून प्रकरणी कोणही बोलायचे नाही असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *