Breaking News

राजकारण

जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या होम टर्फवरच… सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे...

जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

नागपूरातील पराभवानंतर भाजपाने मारली पलटी, ते भाजपा उमेदवार नव्हते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपाच्या मातृसंस्थेचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपा उमेदवार ना.गो.गाणार यांचा निम्याहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबले हे विजयी झाले. विशेष म्हणजे गाणार यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. तरीही ना.गो.गाणार यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने पलटी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार पुण्यातील कसबा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ, ६ जण इच्छुक, उद्या मविआची बैठक

पिंपरी चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती …

Read More »

मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत असताना अजित पवारांचे मोठे विधान सत्यजीत तांबेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

नाशिकमधील तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या बंडाला भाजपाने दिलेली साथ आणि निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत आहेत. तसेच निवडूण आल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिकच्या जागेवर सत्यजीत …

Read More »

निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा जाहिर झालेल्या उमेदवाराची पहिली विजयी सलामी कोकण शिक्षक मतदार संघ शेकापकडून हिसकावून घेत भाजपा-शिंदे गटाने राखली

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. तसेच २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता कोकणमधील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी-शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत …

Read More »

भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मारली मुसंडीः आडबाले विजयी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील पराभवाचा काढला वचपा

आगामी राज्यातील मुंबईसह १४ महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यातच नुकतेच सी व्होटरने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातील अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर लगेच राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी झालेल्या …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले ? CM, DyCm नी केंद्राला विचारावा , शेजारच्या राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही

या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारे बजेट

गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. देशाच्या आणि …

Read More »

शिवसेनेची टीका, हा तर दगाबाज सरकारचा अर्थसंकल्प विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर केला, मात्र सामान्य जनतेला दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात शेतीच्या दृष्टीने …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, ‘अमृत काळ’चे वेस्टन लावून मूळ प्रश्नांना बगल देणारा अर्थसंकल्प’ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प

लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. …

Read More »