Breaking News

पोलिस आयुक्तांच्या त्या व्हिडिओनंतर नवनीत राणा म्हणाल्या, मी तर सांताक्रुज… अॅड ऱिझवान मर्चंट यांनी व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

अमरावतीच्या राणा दांम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्याला पिण्यासाठी पाणी दिले नाही, तसेच बाथरूम वापरायलाही दिले नसल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करत त्याची तक्रार लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवित केली. त्यावर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलिस ठाण्यातील तो व्हिडिओच आपल्या ट्विटर अकॉंऊटवरून प्रसारीत केला. आता या व्हिडिओनंतर नवनीत राणा यांनी आपल्याच आरोपावरून घुमजाव करत मी खार पोलिस ठाण्यातील वागणूकीबद्दल नव्हे तर सांताक्रुज येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या वागणूकीमुळे आपण आरोप केल्याचे त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांच्या मार्फत दावा केला.
खासदार नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी यासंदर्भात एक त्यांनी तयार केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत केला आहे. त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, सदरचा व्हिडिओ हा माझे अशील खासदार नवनीत राणा यांच्या विनंतीवरून तयार करत असून त्यांच्या वतीने ही वक्तव्यं करत आहे. एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नवनीत राणा यांनी अटकेत असताना पोलिसांकडून मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की, अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तिथे अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारलं होतं, याबद्दल काही म्हणणं नाही.
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, पण ते रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. नंतर त्यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. रात्रभर आणि कोर्टात हजर करेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात आले होते. नवनीत राणा यांनी केलेले आरोप खार पोलीस ठाण्यात होते तेव्हाचे नसून सांताक्रूझमधील जेलमध्ये असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल आहेत असे त्यांनी राणा यांच्यावतीने अॅड रिझवान यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले.

नवनीत राणा यांचा आरोप नेमका काय?

पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवले. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *