Breaking News

अखेर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला नकारच, ट्विट करत दिले “हे” कारण काँग्रेसकडून ट्विट करत दिली माहिती

मागील काही दिवसांपासून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. मात्र आज अखेर प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ चर्चा केली होती. प्रशांत किशोर यांनी या बैठकीत एक दीर्घ सादरीकरण केलं होते. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीबाबत काँग्रेससमोर असलेल्या आव्हानांबद्दलचे मुद्दे प्रशांत किशोर यांनी मांडले. तेव्हा या मुद्द्यांवर एक गट स्थापन करत त्याबद्दलचा अहवाल तयार करण्याचे आदेशही सोनिया गांधी यांनी तात्काळ दिले होते.असं असतांना प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला अचानक पुर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबत खुलासा केला असून प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणावर आधारीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर एका कृती गटाची स्थापना काँग्रेस अध्यक्षांनी केली. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत या गटाबरोबर काम करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. प्रशांत किशोर यांनी ही मागणी नाकारली आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षासाठी मांडलेल्या सुचनांचे हे स्वागत आहे असं रणदीप सुरजेवाला ट्विटमध्ये म्हणाले.

तर प्रशांत किशोर यांनीही ट्विट करत खुलासा केला आहे. कृती गटाचे सदस्य होत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची ऑफर मी नाकारत आहे. खरं तर माझे नम्र म्हणणे आहे की माझ्यापेक्षा पक्षाला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामुहिकपणे दूर करणे आवश्यक असल्याचे ट्विट प्रशांत किशोर करत काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.
तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती बरोबर असलेल्या संबंधावरुन प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा फिस्कटली असावी असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एवढंच नाही तर काँग्रेसची ऑफर नाकारल्यावर प्रशांत किशोर गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुकीसाठी काय भूमिका घेणार हे अजुन स्पष्ट झालेलं नाही.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *