Breaking News

राज्यसभेच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्याच्या हालचाली

हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर निवडूण पाठवयाच्या एका जागेकरीता मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाला क्रॉस व्होटींग केल्याने भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात भाजपाचा उमेदवार कसा निवडूण आला यावरून राजकिय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच हिमाचल प्रदेश सरकार आता राजकिय रस्सीखेचीच अडकत चालले असल्याची माहिती पुढे येत आहे.

राज्यसभेसाठी हिमाचल प्रदेशातून एका जागेसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षातील आमदारांनी क्रॉस व्होटींग करत भाजपाच्या उमेदावाराला मतदान केले. त्यातच आज काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील हिमाचल प्रदेश सरकारचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच विधानसभेतील भाजपाच्या १५ आमदारांना ऐन अर्थसंकल्पिय अधिवेशनातच निलंबित केल्याने राजकीय गदारोळ चांगलाच निर्माण झाला आहे.

या सगळ्या घडामोडीतच राज्याचा अर्थसंकल्प आवाजी मतदानात मंजूर करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंग पठाणीया यांनी विधानसभेचे कामकाज तहकूब केले.

सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेत सध्याच्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्पावर मतदार घ्यावे अशी मागणी केली. याच अधिवेसनात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात अविस्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केल्याची माहिती बाहेर येताच अर्थसंकल्पिय अधिवेशन घाई-घाईत काँग्रेसने संपविले.

दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सखू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यातील काँग्रेसच्या विचारधारेचे सरकार पाडण्याच्या हालचाली केंद्रीतील उच्च पदस्थांच्या माध्यमातून पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु आम्ही तो प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगत हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांचाही गैरवापर करण्यात आला. त्याचबरोबर राज्य सरकारच्या पोलिसी यंत्रणेचाही वापर करण्यात आला. त्यासाठी केंद्रातील भाजपाच्या सरकारने हेलिकॉप्टर पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या काँग्रेसच्या सरकारने हा प्रयत्न हाणून पाडला. सरकार पाडण्यासाठी काही आमदारांना आमिषे दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच काही आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही भाजपाचा हा खेळ उधळून लावण्यासाठी काही आमदारांनी जाणीवपूर्वक क्रॉस व्होटींग केल्याच्या विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव पुढे आणला. त्याविरोधात सुनावणीही घेण्यात आल्याचे सांगितले.

त्याचबरोबर ज्या एका काँग्रेसच्या आमदाराने आमीषाला बळी पडून क्रॉस मतदान केले. त्याने आता माफी मागितली असल्याची माहितीही सुखविंदर सखु यांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *