Breaking News

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, राजकिय वर्तुळात मात्र भलत्याच चर्चेला उधाण ट्विट करत स्वतः दिली माहिती

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबादेत आयोजित मनसेच्या सभेत ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातून विरोध वाढू लागला. त्यातच राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचे कारण पुढे करत अयोध्येचा दौऱाच स्थगित करत असल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली. त्यामुळे अयोध्येत जावू संभावित घडणाऱ्या आणि त्याच्या पडसादांना राज ठाकरे यांनी पूर्ण विराम दिला. मात्र त्यांच्या अचानक दौऱा स्थगित करण्यामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात भलत्याच चर्चांना उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिली. पुण्यातील २२ मेच्या सकाळच्या सभेमध्ये आपण बोलूच असे सांगत यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित केला. राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केला. तसेच पुण्यातल्या सभेत सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनीच ट्विटरद्वारे स्पष्ट केले.
परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अचूक टायमिंग आणि अचूक मुद्यांच्या बाबत आतापर्यत सर्वच राजकिय पक्षांनी कौतुक केले. परंतु राज ठाकरे यांना एकाचवेळी निर्माण झालेले परस्पसेशन अर्थात एखाद्या भाषणातून तयार झालेला आभास टिकविण्यात यश येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. तसेच राज ठाकरे यांनी आतापर्यंत एखादी भूमिका घेतली किंवा जाहिर केल्यानंतर त्यांच्याकडून कधी माघार घेतल्याची माहिती ऐकिवात नाही. परंतु यावेळी त्यांनी पहिल्यांदाच स्वतःची जाहिर केलेली घोषणा मागे घेत स्थगिती दिल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असल्याचे मत राजकिय वर्तुळातील काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अयोध्येचा दौरा जाहिर केल्यापासून उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याकडून सातत्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सातत्याने विरोध करत उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा सातत्याने देत आहे. तसेच त्यास तेथील संत-साधूंचाही त्यांनी पाठिंबा मिळविला आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर गेले असते तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे कदाचित ही परिस्थिती टाळण्यासाठीच त्यांनी अयोध्येचा दौऱा रद्द केल्याची भूमिकाही काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुसऱ्याबाजूला राज ठाकरेंना भाजपाकडून अप्रत्यक्ष मदत करण्यात येत असल्याची चर्चा राज्यात उघडपणे सुरु आहे. मात्र भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला. त्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या खासदाराला समजविले जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीहीही त्या खासदाराने सातत्याने राज यांच्या विरोधात सातत्याने इशारे देण्याचे आणि अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे काम सुरुच ठेवले. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपानेच भरीस घातले आणि भाजपानेच त्यांचा गेम केल्याचे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील काही पक्षांनी केला.
राज ठाकरे हे उत्कृष्ट वकृत्व असलेले नेते आहेत. हाती कोणतीही सत्ता नसताना त्यांच्या सभांना लाखोंची गर्दीही होते. मात्र त्या गर्दीला मतांमध्ये परावर्तित करण्यात अपयश येते. यामागे त्यांच्या बोलणे आणि कृतीतून निर्माण होणारी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा या दोन गोष्टींमुळे त्यांचा राजकिय घात होत आला आहे. मात्र ती चुक त्यांनी दुरूस्त करण्यचा किंवा त्यावर भाष्य करून जनतेत असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्नही ते करत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते. अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करणे आणि पुन्हा तो दौरा ब्रिजभूषण यांच्या इशाऱ्यानंतर रद्द करणे या गोष्टी राजकियदृष्ट्या त्यांनाच घातक ठरत असून त्यांच्या दौऱ्यातून पुन्हा चुकीचा संदेश निर्माण झाल्याचे मतही अन्य एका राजकिय नेत्याने व्यक्त केले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *