Breaking News

गिरिष महाजन एकनाथ खडसे यांच्याबद्दल म्हणाले, पंगत बसली अनं बुंदी संपली… महाविकास आघाडीची सत्ता उलथविल्यानंतर खडसेंना लगावला टोला

जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचे गिरिष महाजन आणि पूर्वाश्रमीचे भाजपावासी अनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकिय वैर जगजाहिर आहे. या दोघांमध्ये स्थानिक पातळीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखविण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना एकनाथ खडसे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीसह भाजपामध्ये सुरु होती. मात्र विधान परिषदेवर खडसे निवडूण गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार गेले. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी मंत्री गिरिष महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, लग्नात पंगत बसली अनं बुंदी संपली तर मंदिरात गेले तर प्रसाद संपला अनं बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली असल्याचा खोचक टोला लगावला.

आज गिरिष महाजन हे जळगांव मध्ये आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधाचा आधार घेत त्यांनी हा टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर पडले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असं मी म्हणणार नाही, पण सोशल मीडियावर म्हटलं जातंय. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

खरंतर, एकनाथ खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भारतीय जनता पार्टीत होते. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडून देखील आले. पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंविरोधात खोचक टीका केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *