Breaking News

किरीट सोमय्या म्हणाले, पुराव्याशिवाय बोलत नाही, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अटक करावी खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंचे १९ बंगले गायब केले

मराठी ई-बातम्या टीम

चहावाल्यानंतर चाळवाला… आता योगेंद्र, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हेल्थकेअर सोबत आणखी एक बोगस कंपनी काढली होती. त्याचे नाव होते इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विसेस आणि त्याचं नाव होते लाईफलाईन हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. त्यामध्ये तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो परत आज चाळ नंबरमध्ये कुठल्यातरी खोलीत, त्याचा रुम नंबर १७ बी दादाभाई चाळ, परळ मध्ये राहतो. सगळ्यात मजेदार बाब अशी आहे की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर हे कोविड सेंटरसाठी स्वत: दोन बेनामींना पुढे घेऊन, अर्ज करायचे. एक लाईफलाईन हेल्थ केअर आणि दुसरं इटर्नल हेल्थ केअर म्हणजे महापालिकेचा, ठाकरे सरकारच्या चोपड्यामध्ये या सेंटरसाठी दोघांचा अर्ज आला आहे, स्पर्धा आहे असे दिसायचे आणि दोघांमधून एक निवडले जायचे असा गौप्यस्फोट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

या दोन्हींमध्ये सुजीत आणि तेच पार्टनर तेच सगळे, एकामध्ये सीईओ चहावाला दुसऱ्यामध्ये सीईओ चाळवाला. दुसरी कंपनी इटर्नल हेल्थ केअर जी आहे, ही फसवणूक केली आहे. त्याच्या वकीलाने, सुजीत पाटकर इटर्नल हेल्थकेअरच्या वकीलाने पोलिसात लेखी तक्रार दिली आहे की, माझी स्वाक्षरी खोटी करण्यात आली आहे. म्हणजे संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर काय काय उद्योगधंदे करतात असे सांगत लबाडी, घोटाळा आणि फसवणूक उद्धव ठाकरे तुम्ही कारवाई केव्हा करणार आहात? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

किरीट सोमय्या म्हणाले की, “मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. यांनी केलेले घोटाळे याचा हिशोब चार्टड अकाउंटंट किरीट सोमय्या जनतेचा ऑडीटर बनून. आता रश्मी ठाकरेंचे १९ बंगले? आता जानेवारी २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला, उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये त्याचं टॅक्सेसचं पेमेंट केलं. उद्धव ठाकरेंचे सरपंच मिसाळ हे मी ज्यावेळी २०२० मध्ये गेलो होतो, त्यावेळी सांगतात, आहेत बंगले. पैसे घेतायत त्यात तुझं काय? असं म्हणत काय शिव्या दिल्या होत्या मला त्यावेळी. परवा देखील सकाळी त्याने वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आणि सांगिलं की आहे बंगले आणि दुपारनंतर दुसऱ्या वृत्तवाहिनीशी बोलतान म्हणतो बंगले नाहीत. मग मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी ते पाडले असतील तर मला माहिती नाही.”

किरीट सोमय्यावर आता १८ वा खटला, मी जाणार आहे उद्या छगन भुजबळची बेनामी संपत्ती, छगन भुजबळांचा घोटाळा मी उघड केला. भुजबळांना दोन वर्षे तुरुंगात रहावं लागले. आता सत्तेत आले तर त्या बेनामी संपत्तीची पाहणी करायला किरीट सोमय्या गेले तर किरीट सोमय्याला लगेच नोटीस. मी उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर करा मला अटक करा असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

मला विरोध कुठेच होत नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे. कारण, हजारो कोविड रुग्णांच्या कुटुंबांचं एवढं नुकसान झाले. ते निरोप पाठवत आहेत, की आमचा मुलगा यासाठी गेला? आता बोगस चायवाला आणि चाळवलाच्या फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना उद्धव ठाकरेंनी काँट्रॅक्ट दिलं म्हणून. म्हणून त्यांच्या व्यथांना मी वाचा देतोय. विरोध? उद्धव ठाकरेच्या माफिया सेनेचे काही लोक अडवायचा प्रयत्न करत आहेत. पण ते यशस्वी होणार नाहीत. मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाणार पोलिसांच्यासमोर बसणार की, हो भुजबळांची १०० कोटींची बेनामी संपत्ती जप्त झाली आहे. त्याची सुरुवातीस माहिती मी दिली होती, घोटाळा मी काढला होता आता बदला म्हणून तुम्ही किरीट सोमय्यांना अटक करताय? करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *