Breaking News

विनायक राऊतांचा नारायण राणेंवर पलटवार, खोदा पहाड निकला कचरा… भाजपाच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड

मराठी ई-बातम्या टीम

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आलेल्या तक्रारीवरून घराच्या बांधकामासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर राणे यांनी काल ट्विट करत गर्भित इशारा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत मातोश्री-२ चे काम पैसे देवून नियमित करण्याता आल्याचा गंभीर आरोप करत भुजबळ आणि मातोश्रीचे गुन्हे सेम असून ईडीला सर्व माहिती दिल्याचे सांगितले. राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, राणेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा असा उपरोधिक टोला लगावत राणेंची केविलवाणी धडपड पाहुन वाईट वाटतं अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

नारायण राणे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

काल १८ फेब्रवारी रोजी केंद्रीय सूक्ष्म मंत्री म्हणजेच सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण यांनी एक ट्विट केले होते आणि खासदार विनायक राऊत यांच्यासाठी एक खास बातमी, मातोश्रीवरील चार जणांना ईडीच्या नोटीसा येणार, हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? अशा पद्धतीने माझ्या नावाचा उल्लेख करून काल राणेंनी ट्विट केल्याचे वाचणात आले. आणि आज या महोदयांची एक पत्रकार परिषद देखील सकाळी ऐकली. नारायण राणेंनी ज्या बडेजावात ट्विटच्या माध्यमातून घोषणा केली होती आणि पत्रकार परिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा..अशी त्यांची अवस्था झाली. केवळ भाजपाच्या गुडबूक मध्ये राहायचं, यासाठी नारायण राणे यांची ही चाललेली ही केविलवाणी परिस्थिती पाहिल्यनंतर, खूप वाईट वाटतं असा उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करत असताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्कारायाची. हे केवळ आणि केवळ कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून. म्हणून मला एकतर सर्वजण प्रश्न करत आहेत. की एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा निश्चितच केंद्रीय पदाचा केलेला दुरुपयोग असल्याचे त्यांनी सांगितले.

एकतर ईडीच्या नोटीसा येतील असं सांगण्याचं धाडस करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालायतून कागदपत्रांची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल असा आरोप करत मुंबईची ईडी गँग कशा पद्धतीने काम करते. कोणाकोणाच्या सुपाऱ्या कशा पद्धतीने वाजवल्या आहेत, हे मागील वेळी संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहेच. आम्ही देखील म्हणजे मुंबईतील ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपदव्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी, हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसद अधिवेशनात देखील त्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगत पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत, ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम, एकतर केंद्रीयमंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालायातील कागदपत्रांची चोरी, केंद्रीयमंत्री करत असतील असा थेट संशय कालच्या ट्वीटवरून आमच्या मनात येतोय. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लावावाच लागणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *