Breaking News

नारायण राणे म्हणाले, भुजबळ आणि मातोश्रीचे सेम तेच गुन्हे, मातोश्री-२ पैसे देवून नियमित आजारपणाबद्दल बोलणार नाही पण दुसरा असता तर त्याने राजीनामा दिला असता

मराठी ई-बातम्या टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने जुहू बीच येथील बंगल्याची मोजणी करण्याच्या अनुषंगाने नोटीस बजावल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कोणाच्या आजारपणाबद्दल मी बोलणार नाही. पण त्या पदावर दुसरा कोणी असता तर त्याने राजीनामा दिला असता असे सांगत परंतु काही जणांनी दुसरी मातोश्री बांधून पूर्ण केली. या मातोश्रीचे काम नियमित नव्हते तर पैसे देवून नियमित करून घेतल्याचा आरोप करत भुजबळ ज्या गुन्ह्यात आत गेले तेच सेम गुन्हे मातोश्रीने केले असून भुजबळ आत गेले मग हे का अजून आत गेले नाहीत, असा सवाल करत ईडीची नोटीस तयार असून त्यानुसार लवकरच कारवाई होणार असल्याचा इशारा दिला.

सुशांत सिंग राजपुत याची हत्याच झाल्याचा दावा करत त्याची मॅनेजर दिशा सालियन हीच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यासाठी मदत करणारे कोण होते असा सावल करत दिशा सालियन हीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट अद्याप बाहेर आला नसल्याचा दावाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

सुशांत सिंग राजपुत याच्या घरात सावंत नावाचा माणून काम करत होता. तो कुठे गेला, ज्या इमारतीत ही घटना घडली त्या इमारतीचा वॉचमन कुठे गायब झाला आणि या सगळ्या प्रकरणात रॉय नावाचा जो व्यक्ती होता त्याला अद्यापही का अटक करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करत त्या इमारतीचे जे रजिस्टर होते येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करायचे त्यातील पाने कोणी फाडली असा सवाल करत या सगळ्यांचे पुरावे आपल्याकडे असून वेळ आल्यावर ते सर्व पुरावे आपण सादर करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्यांनी काहीही केलं तरी मी काहीच बोलायचं नाही का? प्रत्येकवेळी त्यांनी बोललं की मी काय मातोश्रीवर मिठाईचा पुडा पाठवायचा का? असा उपरोधिक सवाल करत मी १३ वर्षे आयकर खात्यात नोकरी केली असून सुरुवाती पासून मी मेहनत केलीय. मी व्यावसायिक असून दुसऱ्याकरवी हत्या करवून घेण्याची कामे केली नाहीत. मी कष्टाने सगळं मिळवलय. आपल्या शेपटावर पाय दिला की वाघ कसा चवताळतो, मला हे सहन होत नाही. मी सहन करणाऱ्यांपैकी नाही. या घटना मी आयुष्यात कधी विसरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर काही प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न केला की, तुमच्याकडे पुरावे आहेत का? त्यावर राणे म्हणाले, मी केंद्रीय मंत्री आहे. मला कधी कुठे काय बोलायचं, कधी कुठले पुरावे द्यायचे हे मला चांगले कळते. हत्येचं प्रकरण कधी बंद करता येत नाही तसे ते कधीही उघडता येते असे सांगत मातोश्री संबधित सर्व माहिती ईडीला पोहोचविल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेत आधी वाघं होती आता सगळी मांजर कशी झाली कळलं नाही. स्वत:ला वाघ बोलणारे मांजरे कसे झाले कळले नाही. शिवसेनेत म्यॉंव म्यॉव कोण आहे मला माहित नसल्याचे सांगत नितेश मधील कलाकार जागा झाला असून तो कलाकार होतोय याचं समाधान होतेय असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

माझ्या किंवा माझ्या दोन्ही मुलांच्या नावाने महापालिकेची नोटीस आली नाही. बंगल्याचे जे नाव आहे त्यानावाने नोटीस आली. महापालिकावाले आले त्यांनी ती बाहेर चिटकावली आणि निघून गेले. आतापर्यत तीन वेळा या बंगल्याची चौकशी झाली. पण आतापर्यत काहीच आढळून आले नाही. आता ही चौथी वेळ आहे. २००९ साली मी येथे रहायला आलो. त्यावेळी बाळासाहेब जिवंत होते. त्यांना मी सांगितले मी जुहूला घर करतोय. त्यांनी माझं अभिनंदन केले. परंतु ते राहीले नाहीत. ते असते तर नक्कीच आले असते असे सांगत मराठी माणूल तडीपार झाला उध्दवस्त झाल्याचा आरोप करत १९६६ साली मुंबईत किती मराठी माणूस होता आणि आता किती हे बघा एकदा. रमेश मोरे, जयंत जाधव यांची हत्या का झाली ? हे आम्हाला माहित नाही का? कुणी असं समजू नये. पण आम्ही हे काढलं नाही अजून मी खोलात जाईन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *