Breaking News

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल मिडीयावर या लघुकथा, उपरोधिक टोल्यांमधून चौकीदार शब्दाची मोठ्या प्रमाणावर यथेच्छ टींगल-टवाळी उडविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ची घोषणा केली. तसेच स्वतःच्या ट्वीटर हँडलवर नावाआधी चौकीदार असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेल्या या कृतीचे भाजपच्या सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आणि सरकारमधील मंत्र्यांनीही अनुकरण केले. त्यामुळे भाजपच्या कोणाचाही सोशल मिडीयातील प्रोफाइल पाह्यल्यास चौकीदार हा शब्द वापरल्याचे दिसून येते.
भाजपच्या या घोषणेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासह सर्वसामान्य नागरीकांनीही या घोषणेची टींगल-टवाळी सुरु केली आहे. यामध्ये ट्वीटर आणि व्हॉट्सअँपवरून चौकीदाराच्या कथा तयार करून त्या ऐकमेकांना फॉरवर्ड करण्यात येत आहेत.
यातील काही निवडक काँमेंटस खास आपल्यासाठी

Vaibhav Walia @vbwalia
चीकू राजा की कहानी
एक बार चीकू राजा की चोरी पकड़ी गई। सब लोग चीकू चोर है चीकू चोर है कहने लगे। चीकू राजा को बाहर निकलने में भी शर्म आती
उसने सभी सभापतियों का नाम बदलकर चीकू रख दिया
अब जब लोग बोलते चीकू चोर है तो राजा को इतना बुरा न लगता
पर लोग जानते थे असली चीकू (चोर) कौन है।

Nawab Malik @nawabmalikncp
सभी भाजपाई अपने आप को #चौकीदार घोसित कर रहे है क्या नेपाल में घर ले रक्खा है चुनाव के नतीजों के बाद वहीं जाने वाले हैं
#चौकीदार_चोर_है

Shreenivas Bikkad @shreenivasab
भारताचा पार नेपाळ करून टाकलाय राव..
देणार होते २ कोटी “रोजगार” करून टाकले सगळे “चौकीदार”
म्हणे, मै भी चौकीदार !??
#चौकीदार_ही_चोर_है

Vaibhav kokat @ivaibhavk
डॉक्टर झालेला नावापुढे Dr. लिहतो,
इंजिनिअर झालेला Er. लिहतो,
अन बेरोजगार चौकीदार लिहू लागले आहेत..!

shrikant dholke @shrikantdholke
‘मैं भी चौकीदार’ के समर्थन में हाथ उठाने के पहले जान लें, कि ऐसा कर आप स्वयं को ‘मैं भी चोर ‘ घोषित कर देंगे!

amey tirodkar @ameytirodkar
उद्धव ठाकरे पंढरपूरच्या सभेत म्हणालेले की “चौकीदार चोर हैं”.
आणि
आता देवेंद्र म्हणतात की, “मैं हूं चौकीदार”.

Pratik Patil @Liberal_India1
एकेकाळी तिसऱ्या जगाचे नेतृत्व करण्याऱ्या भारताच्या पंतप्रधानाकडे मानाने पाहिले जायचे.या माणसाला चौकीदार ट्विटर हँडलला लावण्यापूर्वी इतके देखील भान नाही राहिले की देशाचा पंतप्रधान म्हणून जगाची लोकं पाहत असतात.
इतका वाह्यात आणि पीएम या देशाने कधी पहिला नाही आणि पुढे देखील पाहू नये

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *