Breaking News

अंबादास दानवे यांचा इशारा,… याप्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अंबादास दानवे म्हणाले की, आज राज्यात दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांची विविध समस्यांमुळे झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असलेल्या सरकार सोबत चहापाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांप्रती देशद्रोह ठरेल, म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या आदल्यादिवशी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सरकारने आयोजित केलेल्या चहापाणी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सरकारने ४० तालुक्यात केलेली दुष्काळ मदत ही राजकिय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत राज्यातील सर्व तालुक्यात दुष्काळाची मदत जाहीर झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

तसेच पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, नागपूर, संभाजीनगर, ठाणे, कळवा व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधां अभावी दुदैवी मृत्यूच्या घटना घडल्या. आरोग्य विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. याबाबत सभागृहात आवाज उठविणार असल्याचे ठकावून सांगितले.

अंबादास दानवे म्हणाले, राज्यात मोठया प्रमाणात उघडकीस आलेले ड्रग्सचे प्रकरण पाहता ड्रग्स निर्मितीचे कारखाने अधिकृतपणे सुरू आहे की काय अशी शंका आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचार सरकारी खर्चाने करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच विदर्भ मराठवाडयात मोठया प्रमाणात शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचा दावा केला.

मंत्र्यांची भिन्न विधाने, मुख्यमंत्री खुर्ची वाचविण्यात व्यस्त

यावेळी अंबादास दानवे यांनी टीका करताना म्हणाले, सरकारमधील मंत्री यांच्यात ताळमेळ नसून ते सतत वेगवेगळी विधाने करतात, मुख्यमंत्री यांच त्यांच्यावर नियंत्रण नसून ते खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याची टीका मुख्यमंत्र्यांवर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *