Breaking News

अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे.

अजित पवारांनी समर्थक आमदारांच्या उपस्थितीत राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट-भाजपा सरकारचे अनेक आमदार उपस्थित होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी आमदारांनी आपल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल आणि राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल, एवढंच मी याप्रसंगी सांगतो.

तसेच मुख्यमंत्री शिंदे बोलताना पुढे म्हणाले, काही जण म्हणत होते गुगलीवर विकेट काढली म्हणून. मग आता त्यांना समजलं असेल की कोणी विकेट काढली आणि क्लिन बोल्ड कोण झालं ते असा खोटक टोलाही शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *