Breaking News

दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना

वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दर बुधवारी किंवा दोन आठवड्यानंतर तर कधी महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते. या बैठकीत राज्याशी संबंधित निर्णय घेतले जातात. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुधवारेवजी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीचे निमंत्रण गुरुवारी दुपारी सर्व मंत्र्यांना पाठविण्यात आले. ऐनवेळी आलेल्या या निमंत्रणामुळे मुंबईत उपस्थित मंत्र्यांची पंचाईत झाली. राज्य मंत्रिमंडळचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, दादा भुसे, तानाजी सावंत, विजयकुमार गावीत, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा व सुधीर मुनगंटीवार एवढेच मंत्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते.

तर दिवाळी सणामुळे अनेक मंत्री आपापल्या मतदारसंघात होते तर काही मंत्रायलयाऐवजी आपल्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीऐवजी मतदारसंघातील मतदारांसोबत दिवाळी सन साजरा करण्याला पसंती दर्शविली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही उशिरा निमंत्रण आल्याने आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे काल सायंकाळी रत्नागिरी हून मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जालन्यात ओबीसी आरक्षण मेळाव्यासाठी गेल्याने ते देखील उपस्थित राहू शकले नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याने त्यांच्यासह समर्थक मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली.

दांडी मारणारे मंत्री
छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, उदय सामंत, अतुल सावे सुरेश खाडे राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील आदी गैरहजर होते.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *