Breaking News

Tag Archives: cabinet meeting

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे १५ महत्वाचे निर्णय आदिवासीसह शेतकरी आणि शहरीभागातील नागरिकांना खुष करण्याचा प्रयत्न

राज्यातील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशना निमित्त राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी खास राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेस, मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले …

Read More »

घरकुल अनुदानाची रक्कम वाढवित राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे अनुदान मिळत होते. मात्र केंद्रीय नगरविकास विभागाने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार आता भूमीहिनांना घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीसाठी १ लाख रूपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता …

Read More »

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान

दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट / ८.३ एसएनएफ या प्रती करिता किमान २९ रुपये प्रति लिटर इतका …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प

राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे देताना हात आखडता घेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प असून भरीव मदत जाहीर केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळवून …

Read More »

शेती महामंडळाच्या जमिनीबाबत आणि मुद्रांक शुल्काबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठक

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जसजशी जवळजवळ येत चालली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणीची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम तारीख जसजशी जवळ जवळ येत आहे. तसतशी राज्य मंत्रिमंडळाकडून महत्वाच्या विषयावर निर्णय घेत लोकोपयोगी निर्णय घेण्यात येत असल्याचा सपाटाच विद्यमान राज्य मंत्रिमंडळाकडून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे …

Read More »

दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना

वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …

Read More »

राज्याच्या १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला गती …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विदर्भातील सिंचन कामांना मान्यता देत आयुर्वेद-युनानी महाविद्यालयातील अध्यापकांची पदे भरणे, आश्रमशाळांमधील गणित विज्ञान विषयाशी संबधित शिक्षकांच्या जागा भरणे, संत्रा उद्योग उभारणी, बारामती येथे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणे, मॉरिशस येथे पर्यटन केंद्र उभारणी, राज्यात गोवंशीय प्रजनन कायदा लागू करण्याचा निर्णय आणि वस्त्रोद्योग उभारणीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय …

Read More »

मंत्र्यांच्या मराठा आणि ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली “ही” सूचना

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याप्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले होते. पण ऐन दिवाळीत आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील नागरिकांचे तोंड कडू व्हायला नको म्हणून यावर तोडगा काढत २ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली. तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला. या आरक्षणाच्या …

Read More »