Breaking News

संजय राऊत यांचा पलटवार, वाघाच्या जबड्यात….मग फडणवीस का घाबरत होते? महाविकास आघाडी सरकार असताना अटकेचे षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या दाव्यावरून त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत पलटवार करताना म्हणाले, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे देवेंद्र फडणवीस मग अटकेला का घाबरत होते? असा खोचक टोला लगावला.

आज १५ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी संजय राऊत यांना विचारले असता राऊत यांनी वरील उत्तर दिले.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या भाषणांमध्ये आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोकं आहोत, असं ते म्हणतात. मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे फडणवीस अटकेला का घाबरत होते. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने मला अटक होणार होती, असा दावा करत आहेत. त्यांची जुनी भाषणं ऐकली तर त्यात, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असे ते म्हणाले. मग एवढी हिंमत असलेली व्यक्ती अटकेला का घाबरत होती? असा टोला फडणवीस यांना लगावला.

मुळात फडणवीसांना कोणीही अटक करणार नव्हतं. ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक करू शकतं का? खरं तर आम्ही अडीच वर्षात कधीही असे घाणेरडे कृत्यं केली नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे आता कांगावा करत आहेत. ते गेली अडीच वर्षे नैराश्यात होते. त्यामुळे ते असे आरोप करत आहे. त्यांना अटक करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. साधा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. आमच्यासारखं यंत्रणांनी त्यांना बोलवलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी केले.

पुण्यातील पोटनिवडणुकी बाबत पुढे बोलताना म्हणाले, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला होता. या निवडणुकीत ‘नोटा’ला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. माझ्या माहितीनुसार पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीत पुन्हा मोठ्या प्रमाणात ‘नोटा’चा वापर होणार आहे. भाजपाने नेहमीच मतदारांना गृहीत धरलं आहे. भाजपाविषयी मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. शिवसेनेविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या पुण्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

शिवजयंतीला अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत विचारलं असता, ते कुठंही गेले तरी त्यांना शिवाजी महाराजांचे आशिर्वाद लाभणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्यांनी अभय दिलं, त्यांचं समर्थन केलं. इतकंच नाही, तर जाता-जाता या सरकारने अभिनंदनाचा ठरावही मंजूर केला. असं असताना महाराष्ट्रातील जनता त्यांना पाठिंबा देईल, असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *