Breaking News

नर्सेसना असलेल्या समस्या आरोग्य मंत्री, उपसभापतीसमोर मांडण्याची संधी वेबिनारद्वारे मांडता येणार

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा व कोव्हिड परिस्थितीत आरोग्य कर्मचारी व परिचारिकांच्या समस्या व उपयोजनाबाबत डॉ नीलम गोऱ्हे व राजेश टोपे आरोग्य मंत्री यांच्याबरोबर वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने काविड सेंटरमध्ये येत असलेले अनुभव आणि समस्यां मांडण्याची संधी नर्सेसना मिळणार आहे.

साथी संस्था पुणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान यांच्यावतीने महाराष्ट्रातील आरोग्य विभागाशी संबंधीत विषयावर व कोविडच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिका यांचे संदर्भात ०७ डिसेंबर २०२० रोजी सोमवारी सकाळी ११ .०० वा वेबिनार आयोजित केला आहे. या वेबिनरचे अध्यक्ष म्हणून डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद व प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हजर राहणार आहेत. या वेबिनार मध्ये कोविड कालावधीत प्रत्यक्ष काम करत असलेले आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांचे अनुभव, समस्या व उपाय योजना यावर चर्चा होणार आहे. राज्याचे आरोग्य प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास हे ही सहभागी होणार आहेत. आरोग्यावर काम करणारी पुणे येथील साथी संस्था यांनी कोविड कालावधीत रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवावर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणचे अहवालावरचे सादरीकरण ही यावेळी करण्यात येणार आहे.

संपर्क:-रवींद्र खेबुडकर खाजगी सचिव, उपसभापती विधान परिषद कार्यालय.7719011333

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *