Breaking News

उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती होणार रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई : प्रतिनिधी

लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या भेटीत दिली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार मानले.

सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर केंद्रीय रेल्वे मंत्री गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे मराठवाड्यातील आर्थिक – औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील – निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *