Breaking News

मुंबई

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

“मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार …

Read More »

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन

पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन – हॉप ऑफ बसची सुविधा सुरु आज सुरू केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन …

Read More »

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब त्यांची देणी तातडीने देण्याची खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी

मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद …

Read More »

एम.फील.अध्यापकांना मिळणार ‘कॅस’चे लाभ

११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक …

Read More »

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आदीसह अन्य ठिकाणांना भेटी दिल्या

जी – २० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने …

Read More »

मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे नियोजन समिती बैठक पार पडली या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री लोढा बोलत होते. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी …

Read More »

साडेचार तासाच्या चौकशीनंतर आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले, शुन्य खर्च आला.. जंबो कोविड सेंटर उभारणी महापालिकेला शक्य नव्हती

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या वाटपात आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायलाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नोटीस बजावत आज चौकशीसाठी पाचारण केले. याप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांची …

Read More »

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या …

Read More »

आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ सलग चवथ्या वर्षी प्रथम आविष्कार संशोधन स्पर्धेत मिळविला पहिला क्रमांक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ७९ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करून १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई करत आविष्कार संशोधन स्पर्धेवर …

Read More »

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये घेतला ५५ हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनला दाखविला झेंडा

‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ …

Read More »