Breaking News

जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आदीसह अन्य ठिकाणांना भेटी दिल्या

जी – २० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. परिसरातील प्राचीन वडाच्या झाडाची पाहणी केली. शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली. अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला, तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, वारसा स्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

आगाखान पॅलेसला भेट
तसेच जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत तसेच चरख्याबाबतही माहिती जाणून घेतली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये

विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *