Breaking News

मुंबई

देवेंद्र फडणवीस यांचे आवाहान मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढा

आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले. मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन उपचार केंद्र

विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. …

Read More »

महाराष्ट्राच्या या खेळाडूंना राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार जाहिर

वर्ष २०२३ साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२४ रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल. दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भाजपा हा महिला विरोधी पक्ष

महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज अनेक प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी शरद पवार गटाच्या खासदार तथा कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना …

Read More »

रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जनतेला केले आवाहन

मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य …

Read More »

ओबीसी विद्यार्थीं-विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी मागवले अर्ज

इतर मागासवर्ग प्रवर्गातील अर्थात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या …

Read More »

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकच कळत नाही

राज्यातील सरकार हे दिल्लीच्या आशिर्वादाने बसलेले सरकार आहे. या सरकारकडून दिल्लीच्या आदेशानेच मुंबईची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या लोकायुक्तांना पत्र लिहीत मुंबईतील फर्निचर घोटाळ्याप्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यानुसार लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील …

Read More »

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकासित करणार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी हे सुविधा केंद्र आहेत. परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कौशल्य विकास …

Read More »

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. १ डिसेंबर २०२३ पासून ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत …

Read More »