Breaking News

मंत्रालयात आणखी एक आत्महत्येचा प्रयत्न पाचव्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आज संध्याकाळी आणखी एका तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो विधी व न्याय विभागात कामासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच त्याला तातडीने मंत्रालयातील पोलिसांनी त्याला रूग्णालयात हलविले.

हर्षल रावते हा पैठण येथील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामध्ये कामाला आहे. मात्र तेथील कोण्या एका वरिष्ठाकडून त्याला त्रास दिला जात असल्याने त्याने मंत्रालयात येवून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून त्यात सर्व स्वत:ची कैफीयत मांडल्याचेही एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

मंत्रालयाचे नुतनीकरण केलेल्या इमारतीत जाळी बसविण्यात यावी अशी मागणी मंत्रालयातील पोलिस विभागाने गृहविभागाकडे केली. त्यास साधारणत: आठ महिन्यापूर्वी ही त्या संबधीचा अहवालही सादर करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

विरोधी पक्षांची तात्काळ मंत्रालयात धाव

सदर घटनेचे वृत्त कळताच विधान परिषदेतील धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात धाव घेतली. तसेच उडी मारलेल्या ठिकाणी भेट देवून पोलिसांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर हे सर्व विरोधी पक्षाचे नेते सेंट जॉर्ज रूग्णालयात सदर व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी गेले.  

 

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *