Breaking News

एकनाथ शिंदे म्हणाले, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर ट्रेलर…

काँग्रेसच्या नेत्यांकडून एकाबाजूला यात्रा काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षातील नेते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यासोबत येत आहेत. मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर एक ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

मिलिंद देवरा यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश दिल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, काही जण आमच्यावर सातत्याने हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री म्हणून टीका करत आहेत. मात्र मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने हेलिकॉप्टरने माझी शेती करायला जातोय. पण काही जण हेलिकॉप्टरचा उपयोग फक्त फोटो काढण्यासाठी करत होते अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता.

तसेच एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना काळात घरात बसून फक्त आदेश देण्याचे काम केले. मात्र आन्ही रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. लोकांचे जीव वाचविण्यासाठी काय हवं नको हे पाहिलं. हेच काम त्यांनी घरात बसून करण्याऐवजी बाहेर रस्त्यावर उतरून केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. नुसतं घरात बसण्याऐवजी बाहेर फिल्डवर यावं लागतं, लोकांमध्ये मिसळून काम करावं लागत अशी खोचक टीकाही केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना भगवी शाल प्रदान करत पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर मिलिंद देवरा हे उच्च शिक्षित आहेत. काँग्रेसचा त्याग करून त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर विश्वास आणि मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. देवरा यांच्या येण्याने मुंबई करांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आशाही व्यक्त केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

वंचितला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिडतास खोलीच्या बाहेर बसविले

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बोलाविलेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेसाठी हॉटेल ट्रायडंट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *