Breaking News

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मुंबईतील मिठागरावर भाजपाचा डोळा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . यावेळी मुंबई उत्तर चे लोकसभा उमेदवार, भाजपाचे पीयूष गोयल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘झोपडपट्ट्या शहरातून काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात’, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला .

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘गेली १० वर्षं केंद्रात भाजपाचं संपूर्ण बहुमत असलेलं हुकूमशाही सरकार आहे , आणि ८.५ वर्षं (२.५ घटनाबाह्य सरकार धरुन तुमच्या पक्षाने राज्यावर राज्य केलं आहे. काल तुम्ही मुलाखतीत नमूद केलेल्या गोष्टींचा विकास करण्याच्या भरपूर संधी तुमच्या पक्षाला मिळाल्या होत्या… परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांना काय मिळाल ? मुंबईकरांची केवळ फसवणूक, आर्थिक लूट आणि अभिमानाला ठेच पोहचवण्याच काम तुम्ही केलंत’ असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला .

मुंबईतील मिठागरावर भाजपाचा डोळा- आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपाच्या धोरणावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘पियुष गोयल यांनी अचानक मुंबई उत्तर ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल . त्यांनाही शाश्वत विकास हवा आहे, ज्याला आम्हा सर्व मुंबईकरांचा पाठिंबा आहे. भारताच्या विकासात त्यांचाही मोठा हात आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक नागरीकाला स्वतःचे घर असण्याचे तुमच्या पक्षाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. कदाचित तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लिहिलेली घटना ह्याचसाठी बदलायची आहे – ‘मित्रांचा विकास आणि गरीब हटाओ!’ हे धोरण राबवायच आहे . मात्र शाश्वत विकासासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत. पण बिल्डर्सना फायदा व्हावा ह्यासाठी भाजपाचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा आहे . आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचं बिल्डर लॉबीपासून संरक्षण करू . आणि स्पष्टं दिसतंय, सध्याच्या राजवटीचा हेतू ‘गरीबी हटाओ’ नसून ‘गरीब को हटाओ’ असा आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले .

कांजूर मेट्रो कारशेड डेपो सॉल्टप्लान म्हणून केंद्र सरकारने का रोखला ?

भाजपाच्या धोरणावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे यांनी सरकारला सवाल केला आहे . मेट्रो कार डेपो ३,४,६ आणि १४ च्या कांजूरमार्ग जमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारने सॉल्टपॅन असल्याचा खोटा दावा करून का रोखला होता ? फक्त मुंबईकरांना फायदा होईल म्हणून ? कारशेड कांजूरमार्ग ला मागायचो तेव्हा हेच उमेदवार मंत्री असताना त्यांच्या खात्याने विरोध केला . सरकार पडल्यावर आरे येथे कारशेड आणला आणि मुंबईच्या विकासात खडा टाकण्याचा काम केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले .

तसंच गोयल हे रेल्वेमंत्री असताना ट्रेन बंद करू नका, अस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विनंती केली होती. तरी ट्रेन बंद केली .त्यामुळे मोठया प्रमाणात मजदूरांचे हाल झाले होते. यांची देखील आठवण आदित्य ठाकरेंनी करून दिली .

उत्तर मुंबई प्रमाणे धारावीही भाजपाच्या मित्रांच्या घशात टाकायचा डाव

भाजपाचा उत्तर मुंबई प्रमाणे धारावीही भाजपाच्या मित्रांच्या घशात टाकायचा डाव आहे. झोपडपट्टीतील कामगार वर्ग इलेक्ट्रॉल बॉण्ड विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आदित्यजी ठाकरे यांनी केली. गरीबी हटाओ नाही, तर गरीब हटाव ही भाजपाची मोहीम असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसंच विकसित पोर्टलमध्ये कामगारांचा हात मोठा असतो, मात्र झोपडपट्टी धारकांना मूळ जागेपासून त्यांना दुसऱ्या मिठागरच्या ठिकाणी नेऊन त्यांना बेघर करण्याचा डाव हा भाजपाचा असल्याचं उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे. मात्र वंचित, गरीब झोपडपट्टी धारकांना त्यांना बेघर करणाऱ्याला आमचा तीव्र विरोध आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं .

मी महाराष्ट्रसाठी लढणार आहे -आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावरील करवाहिवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘पक्ष अमोल किर्तीकर यांच्या सोबत आहे. आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतोय . या निवडणुकीत केंद्रात परिवर्तन होणार . परिवर्तन होणार नसतं इतके पक्ष फोडले नसते. राम नाईक यांनी म्हटलंय दाऊदची मदत घेतली होती त्यांनाच पक्षात आता घेतलं. काहीही कारवाही होऊदेत पण मी महाराष्ट्रासाठी लढणार आहे’ , असं आदित्य ठाकरे म्हणाले .

Check Also

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *