Breaking News

अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

यावेळी चोक्कलिंगम् यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे १,१६,५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ४०% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना १२ डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून २८ मार्च पर्यंत ८५ वयावरील जेष्ठ नागरिक यामध्ये १७ हजार ८५० मतदारांचे तसेच ४०% दिव्यांगत्व असलेले ५ हजार ४५३ दिव्यांग मतदारांचे १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील ५३ मतदारांचे २८ मार्च पर्यंत १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत १९० अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या २४१ एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्यभरातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी १ हजार ६५६ Flying Squad Team (FST) व २०९६ Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. राज्यामध्ये या निवडणूकीसाठी ९८ हजार ११४ इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत २८ मार्च पर्यंत २७,७४५ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच १९० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली ५५७ शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत २७,६८५ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती

राज्यामध्ये दि. १ ते २८ मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

जप्तीची बाब

परिमाण

रक्कम (कोटी मध्ये)

1

रोख रक्कम

33.12

2

दारु

23,42,360 लिटर

19.34

3

ड्रग्ज

8,68,772 ग्राम

186.00

4

मौल्यवान धातू

81,802 ग्राम

40.23

5

फ्रिबीज

4,568 (संख्या)

0.42

6

इतर

6,33,692 (संख्या)

63.17

एकुण

342.29

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ०५ लोकसभा मतदारसंघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी रामटेकमध्ये एकुण ३५ उमेदवार पात्र ठरले त्यापैकी ७ जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या २८ आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार २६ आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये २२ उमेदवारांपैकी ४ जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या १८ आहे, गडचिरोली-चिमूर मध्ये १२ उमेदवारांपैकी २ जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या १० तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार १५ आहेत.

पहिल्या टप्प्यात ०५ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल

निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास मतदार नोंदणीची प्रक्रीया थांबविण्यात येते व मतदार यादी अंतिम करण्यात येते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी २७.०३.२०२४ रोजी थांबविण्यात आली आहे व या निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

मतदान केंद्रे

1

9- रामटेक

10,44,891

10,04,142

52

20,49,085

2,405

2

10 – नागपुर

11,13,182

11,09,876

223

22,23,281

2,105

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

9,17,604

14

18,27,188

2,133

4

12-गडचिरोली चिमुर

8,14,763

8,02,434

10

16,17,207

1,891

5

13-चंद्रपुर

9,45,736

8,92,122

48

18,37,906

2,118

एकूण

48,28,142

47,26,178

347

95,54,667

10,652

         मतदारांचा तुलनात्मक तपशील  या  पाच लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

9- रामटेक

16,77,266

19,22,764

20,49,085

2

10 – नागपुर

19,00,784

21,61,096

22,23,281

3

11- भंडारा-गोंदिया

16,55,852

18,11,556

18,27,188

4

12-गडचिरोली चिमुर

14,68,437

15,81,366

16,17,207

5

13-चंद्रपुर

17,53,690

19,10,188

18,37,906

वयोगटानुसार मतदार संख्या

क्र.

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-79

80 +

1

9- रामटेक

31,725

3,83,276

4,90,339

4,76,971

6,20,361

46,413

2

10 – नागपुर

29,910

3,37,961

5,06,372

5,07,640

7,70,700

70,698

3

11- भंडारा-गोंदिया

31,353

3,66,570

3,99,115

3,98,749

5,93,132

38,269

4

12-गडचिरोली चिमुर

24,026

3,28,735

3,56,921

3,48,585

5,25,381

33,559

5

13-चंद्रपुर

24,443

3,42,787

4,25,829

4,20,965

5,86,402

37,480

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण पाच सर्वसाधारण निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एकुण तीन पोलिस निरिक्षकांची आणि सहा खर्च निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील पोस्टल बॅलेट ( Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारे मतदान करणाऱ्या मतदारांची एकुण संख्या ९ हजार ४१६ इतकी आहे यामध्ये रामटेक १ हजार ८६७, नागपूर 1 हजार ००१, भंडारा-गोंदिया ३ हजार २११, गडचिरोली-चिमूर १ हजार ४८३ व चंद्रपूर १ हजार ८५४ इतके मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहे.

लोकसभा निवडणूकीचा दुसरा टप्प्याबाबतची माहिती

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील ०५ आणि मराठवाडा विभागातील ०३ अशा एकूण ०८ लोकसभा मतदारसंघामध्ये २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया २८ मार्च रोजी सुरु झाली असून ४ एप्रिल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात येईल तर ८ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

दुसऱ्या टप्प्यातील 08 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

1

05- बुलढाणा

9,32,208

8,48,573

24

17,80,805

2

06 – अकोला

9,77,007

9,12,731

45

18,89,783

3

07- अमरावती

9,43,263

8,90,705

85

18,34,053

4

08- वर्धा

8,56,813

8,22,513

13

16,79,339

5

14- यवतमाळ – वाशिम

10,01,390

9,37,283

64

19,38,737

6

15 – हिंगोली

9,46,004

8,70,302

24

18,16,330

7

16 -नांदेड

9,54,162

8,95,625

142

18,49,929

8

17 -परभणी

11,02,529

10,17,777

26

21,20,332

 

मतदानासाठी पुढील १२ पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा आवश्यक

आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / PSU / Public Limited कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / MLC यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्र, अद्वितीय अपंगत्व आयडी (UDID) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *