राज्यत थंडीची चाहूल लावलेली असताना दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे असा रिपोर्ट आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचं आवाहन दिलं आहे. राज्य सरकारने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वूमीवर राज्य सरकारच्या खबरदारीच्या सूचना
याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मास्क वापरण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणं टाळावे, सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या उघडू नका, दुपारी १२ ते ४ यावेळेत बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे, लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा,दिवाळीत फटाके फोडणं टाळण्याचा सरकारचा सल्ला अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत .