Breaking News

लोन गॅरेंटर बनण्याचा निर्णय, जामीनदान राहताना ही चूक केल्यास पडेल महागात मैत्री आणि नातेसंबंध जपण्यासाठी कर्जाचे जामीनदार होताना ही चूक करू नका

तुम्हाला एखादी मालमत्ता किंवा काहीतरी बँकेकडे तारण म्हणून गहाण ठेवावं लागतं. तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर बँक तुमच्या त्या मालमत्तेवर आपला हक्क सांगून आपल्या नुकसानीची भरपाई भरून काढते. परंतु काही प्रकरणांमध्ये, कर्ज देताना, बँकेला कर्जाच्या जामीनदाराची आवश्यकता असते.

अनेक वेळा लोक त्यांची मैत्री आणि नातेसंबंध जपण्यासाठी लोन गॅरेंटर होण्यास सहज सहमत होतात. परंतु एखाद्याला कर्जासाठी जामीनदार होण्याचा निर्णय तुम्ही खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे, कारण कर्ज घेणाऱ्यांसोबतच जामीनदाराच्याही काही जबाबदाऱ्या असतात. कर्जदाराने छोटीशी चूक केली तर त्याचे परिणाम कर्जदारालाही भोगावे लागू शकतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.

जर कर्जाची रक्कम अधिक असेल आणि डिफॉल्ट जोखीम जास्त असल्यास. बँकेला कर्जदाराचे योग्य डॉक्युमेंट्स न मिळाल्यास किंवा कर्जदाराचा सिबिल स्कोअर खराब असल्यास. जर मुख्य कर्जदाराचं वय अधिक असेल किंवा त्याचा व्यवसाय जोखमीचा असेल. जर बँकेच्या मूलभूत गरजेत लोन गॅरेंटरचा समावेश असेल.

कर्जदारासोबतच जामीदाराच्याही काही जबाबदाऱ्या असतात. जामीनदाराकडूनही सर्व कागदांवर सह्या घेतल्या जातात. डिफॉल्ट होण्याच्या स्थितीत पहिले बँक कर्जदाराला नोटीस पाठवते. त्यानंतर उत्तर न मिळाल्यास बँक जामीनदाराला नोटीस पाठवते. जर कर्जदार कर्ज फेडू शकला नाही, तर जामीनदाराला ते कर्ज फेडण्याची जबाबदारी घ्यावी लागते.

Check Also

अॅक्सिस बँकेतून ही कंपनी बाहेर पडणार नवीन ब्लॉक डिल करण्याच्या विचारात

ॲक्सिस बँकेत मोठ्या धमाकेदार प्रवेशानंतर सहा वर्षांहून अधिक काळ, बेन कॅपिटल खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यातून पूर्णपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *