Breaking News

कालिचरण महाराज या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक

कालिचरण महाराज हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला परिचित आहे. अनेकवेळा कालिचरण महाराजांनी वादग्रस्त विधाने करून आपल्या अडचणी वाढवल्या आहेत तसेच महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक वेळा त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात आली आहे मात्र आता कालिचरण महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे विधान त्यांनी थेट एका कार्यक्रमात केले आहे.

जनतेची इच्छा असेल तर मी सोलापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले आहे.कालीचरण महाराज हे रविवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांनी हिंदू समाज बांधवाना मार्गदर्शनपर भाषण केले. भाषणानंतर कालीचरण महाराजांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राजकारणात रुची दाखवली.

यावेळी ते म्हणाले की, जनतेची इच्छा असेल तर जरूर निवडणूक लढवेन असे कालीचरण महाराजांनी उत्तर दिले. पण मी खूप कडवा आहे, मला तिकीट कोण देणार असेही स्पष्ट सांगितले. राजकारणात कडवे लोक चालतील का,मी स्पष्टपणे आणि सत्य बोलणारा व्यक्ती आहे. मी धर्माच्या नावावर हिंदूना एकत्रित आणण्याचा कार्य करत आहे.

कट्टर लोक आमदार किंवा खासदार झाली तर नक्कीच हिंदू समाजाचा उद्धार होईल. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आम्ही राजा बनणारे लोक नसून राजा बनवणारे आहोत, असे कालीचरण महाराज यांनी सांगितल. सध्या सोलापूर लोकसभा मतदार संघावर भाजपा खासदार असून हा मतदार संघ अनेक वर्ष माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ताब्यात होता त्यातच शिंदे यांनी लोकसभा मतदार संघासाठी थेट आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केले होते.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *