Breaking News

सानिया मिर्झाच्या सूचक पोस्टने पती शोएब मलिक सोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण सानिया मिर्झाच्या पोस्टने नेटकऱ्यांचे घेतले लक्ष वेधून

भारताची माजी टेनिस पटू सानिया मिर्झा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते मात्र कालांतराने सानिया मिर्झा हिने आपल्या मुलाचा व पतीचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र पुन्हा एकदा माजी टेनिसपटूने अलीकडेच सानियाच्या इन्स्टाग्राम स्टोरीजने घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा एकदा सुरवात झाली आहे.

सानियाने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये लिहिले आहे, ‘मी जर संवाद साधत असेल तर मला काळजी आहे. जर मी शांत राहिले तर माझंच चुकलं आहे.’ अशी पोस्ट इन्स्ट्राग्रामवर केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सानिया आणि शोएब वेगळे राहत आहेत आणि त्यांचा मुलगा इझान सह-पालक आहेत तसेच अद्यापही या दोंघानी घटस्फोटावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.

मात्र दुसरीकडे सानिया आणि शोएब यांचे चाहते दोघांच्या नात्याबद्दलच्या जाणून घेण्यासाठी या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटचा सुगावा घेत आहे आणि यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना आणखी वाव मिळाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी २०१० मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१८ मध्ये मुलगा इझानचे जन्म घेतला. दरम्यान, सानिया नुकतीच उदयपूरमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नात सहभागी होताना दिसली मात्र या लग्नाला तिने एकट्याने हजेरी लावली होती.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती

‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *