Breaking News

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये दिले जातात. सरकार ४ महिन्यांत एक हप्ता जारी करते.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कामे करणे अनिवार्य आहे. ही कामे केली नाही तर १५ व्या हप्त्याच्या पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे तातडीने ही आवश्यक कामे शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. ही दोन्ही कामे न केल्यास त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागेल. शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ते लवकरात लवकर करावे. ई-केवायसी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन किंवा जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन करू शकता.

पीएम किसान योजनेत अनेक लोक फसवणूक करत असल्याने सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. अनेक अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत होते. फसवणूक टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. जमीन पडताळणीसाठीही जमिनीची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील. त्यानंतर अधिकारी जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करतील.

याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही 155261 वर कॉल करून स्थिती तपासू शकता.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *