Breaking News

बिग बॉस वर वायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा वायरल व्हिडिओनंतर बिग बॉस बंद करण्याची नेटकऱ्यांची मागणी

बिग बॉस हिंदीमध्ये एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. भांडणांमुळे प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये अनेक जोड्याही बनतात. काही जोड्या घरातून बाहेर पडल्यावरही टिकतात तर काहींचं नातं तुटतं. सध्या हा या सिझनचा चौथा आठवडा सुरु आहे. दरम्यान ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.

शनिवारी ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यातील लव्हट्रँगलबाबत ईशाची चांगलीच कानउघाडणी केली. ईशा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दोन मुलांसोबत प्रेमाचं नाटक करत असल्याचा खुलासा सलमानने केला. दरम्यान एका एपिसोडमध्ये समर्थ आणि ईशा रोमँटिक झालेले दिसले.

रात्री घरातील लाईट्स बंद झाल्यानंतर दोघंही एकमेकांकडे बघत एकाच बेडवर झोपले होते. तेवढ्यात समर्थने ईशाला किस केल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं. दोघंही खूपच कोजी झाले होते. मात्र त्यांच्या या रंगात अभिषेक भंग करताना दिसतो. तो आपलं ब्लँकेट घेण्यासाठी खोलीत येतो आणि त्यांना पाहतो. तो समर्थला म्हणतो, भाई, कॅमेरा आहे जरा सांभाळून. असं म्हणून तो आपलं ब्लँकेट घेऊन बाहर जातो आणि सोफ्यावर झोपतो.

या व्हिडिओनंतर सलमानसह बिग बॉसवर टीकेची झोड उठली आहे. ‘हा आहे का तुमचा फॅमिली शो’ अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे. बिग बॉसमध्ये या लव्हट्रँगलची जोरदार चर्चा आहे. सलमानच्या कानउघाडणीनंतर नक्की काय बदल होतात हे लवकरच समजेल.

Check Also

टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड

अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *