Breaking News

पती बद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, आज तो माझ्यामुळेच……. त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाल्यापासून सतत वादाच्या चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या दोघांची जोडी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली जोडी ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता तिच्या पतीवर चांगलीच नाराज झाल्याचं दिसून आलं.

याआधीच्या एपिसोडमध्ये एकदा अंकिता विकीवर चप्पर भिरकावताना दिसली. तर एकदा ती त्याच्या प्रँकवर भडकली होती. आता विकी घरातील इतर स्पर्धकांसोबत अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झाली आहे. या एपिसोडमध्ये अंकिता ही बिगबॉस स्पर्धक ईशा मालवियसोबत बोलताना दिसतेय. पती विकी जैन हा इतर स्पर्धकांसोबतच जास्त व्यस्त असतो, असं ती ईशाला सांगत असते.

अंकिता पुढे “विकीची ही सवयच आहे. जेव्हा तो नवीन लोकांना भेटतो, तेव्हा जवळच्या व्यक्तींना तो विसरतो. तो तसाच आहे आणि त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव कसा असतो माहितीये का? त्याला असं वाटतं की आज इतके लोक माझ्या बाजूने उभे आहेत”, असं अंकिता ईशाला बोलून दाखवत असते.

पुढे अंकिता असंही बोलून दाखवते की तिला घरी जायचं आहे. “मला माझ्या घरी जायचं आहे. पती विकी जैनलाच बिग बॉसमध्ये खेळू द्या. कारण तो सर्वांत चांगला स्पर्धक आहे. मी जवळच्या लोकांची साथ कधीच सोडत नाही. मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते. जर विकी आज इथे आहे ना, तेसुद्धा माझ्यामुळेच आहे. कारण त्याला मी इथे आणलंय. विकीला मी एकटं असल्याचं कधीच जाणवू दिलं नाही”, असं ती पुढे म्हणते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार

संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *