Breaking News

थलपती विजयच्या ‘लियो’ सिनेमा रिलीजवर बंदी; नेमकं काय आहे प्रकरण ? तामिळनाडू सरकारने 'लियो'च्या रिलीजसाठी या ठेवल्या अटी मात्र...

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय त्याच्या आगामी ‘लियो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘लियो’ या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही हा सिनेमा घसघशीत कमाई करत आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित ‘लियो’ सिनेमाच्या रिलीजला २० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे थलापती यांचे चाहते काहीसे नाराज झाले आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील एका न्यायालयाने २० ऑक्टोपर्यंत थलपती विजयच्या बहुचर्चित ‘लियो’ सिनेमावर बंदी घातली आहे. सितारा एंटरटेनमेंटचे नागा वामनी यांनी ‘लियो’ या शीर्षकाचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला होता. या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणीही करण्यात आली होती.

विजय थलपतीचा ‘लियो’ हा सिनेमा सुपरहिट होणार आहे. अर्ली मॉर्निंग शोसाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ‘लियो’च्या रिलीजसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सिनेमाचा सकाळचा शो नसेल. सकाळी ९ वाजताचा पहिला शो प्रेक्षकांसाठी असणार आहे.

‘लियो’ या सिनेमात प्रेक्षकांना थलपती याच्या सुपर-डुपर अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात थलापती विजयसह तृषा कृष्णन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैसस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *