Breaking News

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी दिल्या घोषणा ? २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? बावनकुळेंच्या प्रश्नावर एकच आवाज घुमला.....

एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असले तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे फडणवीस यांच्यासह अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा गटाने कंबर कसली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून भारतीय जनता पक्ष कामाला लागली आहे. तर, शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री कसे राहतील यावर शिंदे गटाने भर दिला आहे.

मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच देवेंद्र फडणवीस हेच आगामी मुख्यमंत्री असावेत अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे महायुतीत चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाविजय २०२४ संकल्प दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने बावनकुळे राज्यभर दौरा करत आहेत. ते काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चौक सभाही घेतल्या. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सवाल केला. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? असा सवाल बावनकुळे यांनी केला. त्यावेळी खच्चून भरलेल्या सभागृहातून एकमुखाने देवेंद्र फडणवीस… देवेंद्र फडणवीस… अशी घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिली होती.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *