Breaking News

Editor

कोरोना: मृतकांची संख्या १० हजारावर, घरी जाणाऱ्यांपेक्षा दुप्पट रूग्णांचे निदान ८१३९ नव्या रूग्णांचे निदान, २२३ जणांचा मृत्यू तर ४३६० जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात १ हजार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ४३६० जणांना घरी सोडण्यात आले. यापेक्षा दुप्पटीने अर्थात ८१३९ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ९९ हजार २०२ वर पोहोचली. …

Read More »

मराठा आरक्षण: विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात बाजू मांडणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या बाजू मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी वकिलांची फौज अधिक बळकट करण्यात आली …

Read More »

धार्मिकस्थळे, देवस्थाने उघडण्याची काँग्रेसची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक हे मानसिकरित्या खचत चालले आहेत. तर अनेकजण निराशावादी बनत चालले असल्याने नागरिकांना मुंबईतील देवस्थाने आणि धार्मिकस्थळे उघडावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.अमरजित मनहास यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्ये नागरिकांमध्ये जगण्याची …

Read More »

घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर घरात २ फुटाचा तर सार्वजनिक मंडळ‌ासाठी ४ फुटाची गणेश मुर्ती बंधनकारक

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे… १) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक. २) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि …

Read More »

शाब्बास धारावी ! कोरोना विरोधी लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

मुंबई: प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज …

Read More »

कॉपी बहाद्दर सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे भाजपा नेते अँड आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकारने फक्त अंतिम वर्ष परिक्षांचा “घोळ घालून दाखवला “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आणले. उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी युजीसीनेच केली. सरकारने ना युजीसीचे सर्क्युलर नीट वाचले, ना कसला अभ्यास केला, ना परिणामांचा विचार केला केवळ युवराजांचा हट्ट पुरवला. सगळा कॉपी पेस्ट कारभार सुरू असल्याची टीका …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरात बाधीतांची संख्या १ लाख ६४ हजारावर ७८६२ नवे बाधित रूग्ण, ५३६६ जण घरी सोडले तर २२६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील बाधित रूग्णांची संख्या १ लाख ६४ हजार १७५ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २३०३५ आहे. तर उपनगरात ७३ हजार ७१४ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजार ९७७ वर पोहोचली आहे. २४ तासात मुंबई …

Read More »

धनगर समाजासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गृहनिर्माण योजना बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

चंद्रपूर : प्रतिनिधी भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून …

Read More »

पेन्शन लागू नसलेल्या Z.P कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना १० लाखाचे अनुदान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा त्याची सेवा १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन …

Read More »

मंत्रालयात सापडले आणखी २ बाधित रूग्ण एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपीक कोरोना बाधीत सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर …

Read More »