Breaking News

Editor

अन्य उपाय न मिळाल्यास संपूर्ण लॉकडाऊन दोन दिवसात यासंदर्भातील नियमावली जाहिर करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ढिलाई आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मी अनेकांशी चर्चा करत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. मात्र नवा पर्याय मिळाला तर कडक निर्बंध लागू …

Read More »

स्मारकासाठी मेहनत घेणाऱ्या फडणवीसांना न बोलविण्याचा संकुचितपणा भाजपा खा. नारायण राणें यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागेपासून ते विविध विभागाच्या परवानग्या मिळवण्यासाठी ज्यांनी मुख्यमंत्री असताना सर्वाधिक मेहनत घेतली त्या देवेंद्र फडणवीस यांना आघाडी सरकारने स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रणही न देण्याचा संकुचितपणा दाखविल्याची टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी आज केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोरोनाला …

Read More »

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! लसीकरणासाठी वयाची अट शिथील करण्यासाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात …

Read More »

पुण्यात बार, हॉटेल रेस्टॉरंट बंद तर ७ दिवस १२ तास संचारबंदी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच,  पुणे पीएमपीएल बससेवा पुढील …

Read More »

सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह या व्यक्तींना आता दोन्ही आमदार निवास बंद विधिमंडळ सचिवांकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी स्थानिक पातळीवर कामे मार्गी लागत नाहीत म्हणून मंत्रालयातील येवून कामे मार्गी लावण्यासाठी आणि दुर्धर आजारावरील उपचारासाठी राज्यभरातून मुंबईत येणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मंत्रालयाच्या जवळील आमदार निवास. परंतु आता मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आमदारांचे कार्यकर्त्ये, कामानिमित्त येणारे नागरीक, उपचारासाठी रूग्ण या सर्वांसाठी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवास, …

Read More »

कोरोना : अबब मुंबईत ८ हजारापार तर राज्यात पाच पटीहून अधिक ४३ हजार १८३ नवे बाधित, ३२ हजार ६४१ बरे झाले तर २४९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बाधितांची संख्या ५ ते ७ हजाराच्या दरम्यान नोंदविली जात होती. परंतु आज शहरातील बाधितांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठत थेट ८ हजाराच्या पार गेली असून ८ हजार ६४८ कोरोना रूग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून येण्याचे प्रमाण हे काळजी करायला …

Read More »

जाणून घ्या १० वर्षाखालील बालकांपासून ते ११० वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या १० आणि २० वर्षाखालील तरूणांनाही संसर्ग- वैद्यकिय शिक्षण विभागाच्या अहवालात नोंद

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या संसर्गात राज्यातील ४० वर्षावरील नागरीकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आता कोरोनाच्या २ऱ्या लाटेत मात्र जन्मलेल्या बालकांपासून ते ४० वर्षे वयाच्या आतील नागरीकांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती पुढे आली असून या वयोगटातील बाधितांची संख्याही चांगलीच चिंताजनक आहे. राज्यात यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत …

Read More »

केंद्राने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावेत व्याजदर कपातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात …

Read More »

कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? मोदींच्या चुकांची किंमत सात वर्षांपासून देश मोजतच आहे: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. परंतु देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक …

Read More »

चौकशी समितीवरून फडणवीस आणि मलिक यांचे आरोप प्रत्यारोप : नेमके काय खरे दोन्ही सरकारचे एक सदस्यीय समितीचे आदेश वाचकांसाठी

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना केली. हि समिती स्थापन करताना तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फडणवीस …

Read More »