Breaking News

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले.

बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली.

जागावाटप करारानुसार, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर आणि सासाराम या प्रमुख जागांवर भाजपा उमेदवार उभे करणार आहे.

दरम्यान, JD(U) वाल्मिकीनगर, सीतामधी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शेओहर या जागांवर निवडणूक लढवणार आहे.

याशिवाय, चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) गट वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे.

तथापि, मंत्री पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी गटाशी जागावाटपाचा उल्लेख नव्हता. याबाबत बिहार भाजपाचे प्रमुख सम्राट चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी आवाम मोर्चा (HAM) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (RLSP) प्रत्येकी एका जागेवर लढणार आहे.

लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने शनिवारी केली. बिहारमध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *