Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी

राज्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना महाराष्ट्रातील पहिलीच असावी. मुंबई उपनगरातील उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी जाहिर केली.

यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं बोलताना सांगितले की, पोलिस ठाण्यात पोलिसांच्या समोर गोळीबार करणे ही घटना निषेधार्थच आहे. यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. या चौकशीतून योग्य ती माहिती पुढे येईल आणि संबधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, या घटनेस जबाबदार असणाऱ्या गोष्टींची योग्य ती चौकशी व्हावी यासाठीच उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येईल. तसेच सदरची घटना गंभीर असून कायद्यासमोर सगळे सारखेच आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *