Breaking News

भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात

मणिपूरमधील भाजपा सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला वॉर मेमोरियल येथेून यात्रेच्या शुमारंभास परवानगी नाकारल्यानंतर मणिपूरमधून तौंबल (Thoubal) या ठिकाणावरुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारताचा तिरंगा ध्वज राहुल गांधी यांच्या हाती देत १५ राज्यातून ६७०० किलोमीटर वाहणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेत हा ध्वज सोबत राहणार आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, मणिपूरमधील हिंसाचारला आठ महिने झाले. या हिंसाचारात असंख्य महिला, मुले आणि पुरूषांना मारले गेले. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील जनतेचे अश्रु पुसायला आले नाहीत. कदाचीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नकाशात मणिपूर हे राज्य नसावे असा उपरोधिक टीकाही मोदी आणि संघावर केली.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मी २९ जुलै रोजी येथे आलो होतो. परंतु त्यावेळी येथील सरकार नामक संस्थाच अस्तिवात नसल्याचे दिसून आल्याचा आरोप करत येथील सर्वसामान्य नागरिकही या देशाचे नागरिक आहेत. त्यांचे अश्रू पुसणे आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्याबरोबरच इथल्या नागरिकांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी ही यात्रा येथून सुरु करण्यात आल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मध्यंतरी काहीजण मला भेटायला आले. त्यावेळी अनेकांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्या भागातून यात्रेला सुरुवात करावी. पण मी त्यांना निक्षूण सांगितले की, मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने मला माझ्या मनातील गोष्ट अर्थात मन की बात करायला आलो नाही तर तुमच्या मनातील दुःख, म्हणणे ऐकण्यासाठी आलो असल्याचेही स्पष्ट केले.
तसेच मोदी सरकारकडून देशातील दोन समुदायात निर्माण केलेली कटुता आणि अविश्वासाची भावना कमी करण्यासाठी ही यात्रा सुरु केल्याचेही सांगितले.

तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. यापूर्वीच्या कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर यात्रे दरम्यान त्यांनी अनेक महिला, तरूण पिढी, पत्रकार, विचारवंत या सर्वांच्या भेटी घेत त्यांच्या मनातील विचार जाणून घेतले. यावेळी या सर्व विविध स्तरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या धोरणाविषयीची भूमिका स्पष्ट करत अनेक अडचणी मांडल्या. त्यावेळी देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळत नसल्याचे प्रकर्षणाने दिसून आले. त्यामुळे या यात्रेच्या नावात न्याय असा शब्द समाविष्ट करत मणिपूर ते मुंबई दरम्यान ही यात्रा काढण्यात येत असल्याचेही उपस्थित समुदायासमोर स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *