Breaking News

टीसीएसने केली लाभांशाची घोषणा शेअर्स बायबॅकही करणार

आयटी कंपनी टीसीएस ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसने  ११ ऑक्टोबर रोजी सांगितले की शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दराने केला जाईल. बायबॅक अंतर्गत कंपनी आपले समभाग भागधारकांकडून खरेदी करते. भागधारकांना त्यांचे सर्व किंवा काही भाग बायबॅकमध्ये कंपनीला विकण्याची परवानगी आहे.

९ रुपये लाभांश देणार
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ९ टक्क्यांनी वाढून ११,३४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १०,४३१ कोटी रुपये होता. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश देण्याचा निर्णयही घेतला आहे. या बायबॅक अंतर्गत टीसीएस ४,०९,६३,८५५ शेअर्स खरेदी करेल, जे एकूण इक्विटीच्या १.१२ टक्के इतके आहे.

बायबॅक आकारामध्ये व्यवहार खर्च, लागू कर आणि इतर प्रासंगिक आणि संबंधित खर्च समाविष्ट नाहीत. गेल्या सहा वर्षांत भारतातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीने केलेला हा पाचवा शेअर बायबॅक आहे. कंपनीने अशा चार बायबॅकमध्ये ६६,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. बायबॅकसाठी पोस्टल बॅलेटद्वारे विशेष ठरावाद्वारे शेअरहोल्डरची मंजुरी आवश्यक असेल.

टीसीएसने फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिल्यांदा आपले शेअर्स विकत घेतले. सध्याच्या किमतीच्या १८ टक्के प्रीमियमने १६,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यानंतर जून २०१८ आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अनुक्रमे १८ आणि १० टक्के प्रीमियमने १६,००० कोटी रुपयांच्या दोन बायबॅक झाल्या. गेल्या वेळी आयटी कंपनीने जानेवारी २०२२ मध्ये १७ टक्के प्रीमियमने भागधारकांकडून १८,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. टीसीएस ची २०२३ बायबॅक किंमत ४,५०० च्या मागील बायबॅक किंमतीपेक्षा कमी आहे.

Check Also

बायजूसने वार्षिक शुल्कात केली ३०-४० टक्के कपात विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार इन्सेटीव्ह

एडटेक कंपनी थिंक अँड लर्न, प्रख्यात बायजू ब्रँडची मूळ कंपनी, अलीकडेच अहवालानुसार, अभ्यासक्रम सदस्यता शुल्क …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *