Breaking News

सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक १६०००० हजार कोटींची गुंतवणूक झाली

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात सप्टेंबर महिन्यात १६,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ईन इंडिया (AMFI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

आकडेवारीनुसार, ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येसप्टेंबर २०२३ मध्ये १४०९१.२६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये ही गुंतवणूक २०,२४५.२६ कोटी रुपये होती. मार्च २०२१ पासून सलग ३१ महिने इक्विटी फंडांमध्ये निव्वळ ओघ वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात लार्ज कॅप फंड आणि ईएलएसएस वगळता बहुतांश फंडांमधील गुंतवणूक वाढली आहे. सेक्टोरल किंवा थीमॅटिक श्रेणीतील इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये सर्वाधिक ३१४६ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

दुसऱ्या स्थानावर स्मॉल कॅप फंड आहेत. स्मॉल कॅप फंडांमध्ये २६७८.४७ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. मात्र, ऑगस्टमधील ४२६४.८२ कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम कमी आहे. मल्टीकॅप फंडांमध्ये २२३४.५२ कोटी रुपये, मिड कॅप फंडांमध्ये 2000.88 कोटी रुपये आणि फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये १३५३.९१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

लहान गुंतवणूकदारांमध्ये एसआयपीद्वारे बाजारात गुंतवणूक करण्याबाबत जागरूकता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून १५,२४५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी १६ नवीन फंड ऑफरिंगद्वारे (NFO) ७७९५ कोटी रुपये उभारले आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थानाखालील मालमत्ता (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ४६.५८ लाख कोटी रुपये झाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *