Breaking News

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’ नवरात्री आणि छठ पूजेचे नियोजन महापालिका करणार!

मुंबई शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री लोढा यांनी आजवर प्रत्येक निर्णय प्रक्रियेत जनतेला सहभागी केले आहे. त्याप्रमाणे यावेळी सुद्धा सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या सूचना पालकमंत्री लोढा यांनी नमूद करून घेतल्या व त्यानुसार तात्काळ अंमलबजावणसाठी आदेश दिले. उपस्थित नागरिकांच्या विनंतीला मान देत यावेळी बिगर व्यावसायिक नवरात्र मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावर्षी नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून,पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी एक अनोखी संकल्पना सुचवली आहे. या संकल्पनेनुसार नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्यावेळी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्याद्वारे जनजागृती बॅनर्स लावण्यात येतील.

या फलकांद्वारे खालीलप्रमाणे सूचना जनजागृतीसाठी प्रसारित करण्यात येतील.

 

१. अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल नंबर देऊ नका!

२. अनोळखी व्यक्तीने दिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ स्वीकारू नका!

३. सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय झालेल्या लोकांशी भेटीगाठी टाळा!

४. कोणीही आपला सतत पाठलाग करत असल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्या!

५. दांडिया आणि गरबा नृत्यात आपल्या ओळखीच्याच व्यक्तींसह सहभागी व्हा!

६. उत्सवाच्या वेळोमर्यादा पाळूनच कृपया आपल्या घरी जा

७. घाई गडबडीमध्ये अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट घेऊ नका!

८. एकांतात कोणासोबतही कोणत्याही ठिकाणी जाऊ नका!

९. आपला येण्याजाण्याच्या वेळी रहदारी असलेला रास्ता निवडा!

१०. कोणताही अनोळखी व्यक्ती कॅमेराच्या माध्यमातून आपले शूटिंग करत नाही याची काळजी घ्या, सतर्क रहा!

११. कोणत्याही संकटात १०० नंबर डायल करून, अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ डायल करून पोलिसांची मदत घ्या!

१२. आपला थोडासा निष्काळजीपणा आयुष्य उध्वस्त करणार नाही याची काळजी घ्या, सतर्क रहा!

या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत, म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येईल. याकाळात पोलिसांचे निर्भया पथक संपूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. महिला सुरक्षेची काळजी घेऊन उत्सव जल्लोषात साजरा व्हावा आणि आवश्यक तयारी कोणत्याही विलंबाशिवाय मंडळांना करता यावी यासाठी नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. तसेच दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाश झोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल.

छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्र उत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *