Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे १५ ऑगस्ट २०२३ रोजी दु. १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, व्हर्चुअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्कील इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे ४१९ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, ५४७ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात येईल.

या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *