Breaking News

त्या टीकेवरून अजित पवार यांचा सवाल, आम्ही दोघे काय मुर्ख आहोत का? नाना पटोले यांच्या त्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप

नुकतेच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वॉर रूमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याची टीका केली. त्यावरून अजित पवार यांनी पुण्यातील चांदनी चौकातील पूलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करताना आम्ही दोघे (स्वत: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) काय मुर्ख आहोत का? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वॉर रुम स्थापन केला आहे. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील विविध प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीला राधेश्याम मोपलवार सोडून राज्यातील विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता अजित पवार यांनी सुरू असलेल्या वादाबाबत माध्यमांवर संताप व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले, ‘मुळात स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टींची माहिती घेत असतात. आम्ही जनतेच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत गेलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुढे घेऊन जातोय. मी अर्थमंत्री म्हणून बैठक घेऊ शकतो. शेवटचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेत असतात. त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमचे राधेश्याम मोपलवार ही होते. तरीही नको त्या बातम्या चालविल्या जात आहेत असा दावाही केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सरकार कोणाचेही असो. शेवटचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही काय मुर्ख आहोत?, का असा प्रतिसवाल करायला अजित पवार विसरले नाहीत. ‘पत्रकारांनी खऱ्या बातम्या द्याव्यात. ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे,’ असे सांगून ‘आमच्यात असे काहीही नाही’, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले.

दरम्यान, अजित पवार गटामध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या कार्यक्रमाला मोठा वेग येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *