Breaking News

हसन मुश्रीफ महायुतीत; कोल्हापूरात सतेज बंटी पाटील यांची स्पष्टोक्ती, हे शक्य नाही मुश्रीफ-पाटील यांच्या दोस्तीला ब्रेक

कोल्हापूरच्या राजकारणात भाजपाला काही केल्या टिकू द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. यापूर्वी भाजपाच्या महादेव महाडीक यांच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचे कामही या जोडगोळीने केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनाही महायुतीत येण्याचे आवताण दिले. मात्र सतेज बंटी पाटील यांनी मात्र महायुती सोबत जाणे शक्य नाही असे स्पष्टच सांगितले. त्यामुळे कोल्हापूरात भाजपाचा वारू रोखण्यासाठी आता सतेज बंटी पाटील यांनाच कसरत करावी लागणार आहे. परंतु मुश्रीफ-पाटील यांच्या राजकिय वाटा मात्र वेगळ्या झाल्याचे दिसून येत आहे.

हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्यावर गेल्या आठवड्यात त्यांनी सतेज पाटील यांनी सोबत यावे; तरच त्यांच्याशी मैत्री राहील, अशा शब्दात टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, मुश्रीफ यांनी सोबत येण्याचे आवाहन केले असले तरी मी महायुती सोबत जाणे शक्य नाही, अशा शब्दात टाळीस प्रतिसाद देण्याचे टाळले.

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले गेले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या जनतेच्यावतीने दोन्ही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे नाही तर दिल्लीत होतो. दिल्लीकरांच्या मनात काय चालले आहे; यावरच गोष्टी ठरतात’, असा खोचक टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले असली तरी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. देशाच्या आणि राज्यात राजकारणात काँग्रेस विश्वास देऊ शकतो, असेही सतेज बंटी पाटील यांनी नमूद केले.

Check Also

नांदेडमध्ये आयकर विभागाला धाडीत मिळाली १४ कोटी रूपयांची रोकड, ८ किलो सोने

आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील नांदेडमधील फायनान्स कंपन्यांवर ७२ तासांच्या छाप्यानंतर १४ कोटी रुपये रोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *