Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते सकारात्मक

प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे झालेले नुकसान याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईल, असे ते म्हणाले.

तत्पुर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यानंतर मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *