Breaking News

धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही

राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला मिळत असून धंनजय मुंडे यांनी दिलेले आव्हान पंकजा मुंडे या स्विकारणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

परळी वैजनाथ येथील सभेत धनंजय मुंडे म्हणाले की, “मी इथे कोणाचा फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही” असं म्हणत त्यांनी पंकजा यांना टोला लगावला. धनंजय मुंडे म्हणाले की, मी दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या मोठा करतोय. आपल्या मतदारसंघात प्रकल्प येतायत. जलजीवन मिशनवरून सध्या राजकारण सुरू आहे. परंतु त्याचा प्रस्ताव मी मांडला होता. त्याचा आराखडा मी पालकमंत्री असताना तयार केला आहे. यासाठीच्या तांत्रिक मान्यतादेखील मी मंत्री असताना मिळवल्या असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही आणलेल्या तुमच्या ग्रामपंचायतीतील प्रकल्पांचं भूमीपूजन तुम्ही करा, पण आमच्यावर चुकीची टीका करू नका. मी आपल्या मतदार संघात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणलं आहे. आता माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता राज्यात तुमचं सरकार आहे, देशातही तुमचं सरकार आहे, देशातल्या सर्वात मोठ्या सभागृहात तुम्ही आहात, मग आता तुम्ही त्या एमआयडीसीमध्ये एक मोठा प्रकल्प तुमच्या ऐयपतीने आणा. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही म्हणाल ते मी राजकारण करायला तयार आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता तुम्ही उद्योग आणा.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *