Breaking News

अवघ्या ६ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत स्मार्टफोन, ‘हे’ आहेत पर्याय स्मार्ट फोन आता आपल्या बजेटमध्ये

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही वर्षात स्मार्टफोन ही अत्यावश्यक गरज झाली आहे. कमी किंमतीत आणि चांगले फिचर (features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. स्वस्तातील आणि चांगले तसंच आवश्यक फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते.

तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट ६ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आता चिंता करण्याची कारण नाही. बजेट आणि लोकांची गरज पाहून अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. या स्मार्टफोनच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या आहेत. तुमच्या बजेटमध्ये बसणारे असे स्मार्टफोनचे उत्तम पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये सॅमसंग आणि नोकिया सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 3,000mAh बॅटरी आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर सारखी फिचर्स मिळतील.

 

सॅमसंग गॅलेक्सी एम 01 कोर

सॅमसंगचा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी जुलैमध्ये लाँच झाला. रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवर 5,199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या किमतीत ग्राहकांना 1GB रॅम आणि 16GB स्टोरेजचे व्हेरिएंट मिळतील. या स्मार्टफोनचा 5.3 इंच HD+ TFT डिस्प्ले आहे. याशिवाय क्वाड-कोर मीडियाटेक 6739 प्रोसेसर, 8MP रियर कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा, 3,000mAh बॅटरी आणि Android Go One UI आदी फिचर्स यामध्ये आहेत.

 

कार्बन X21

भारतात हा स्मार्टफोन या वर्षी जून मध्ये लाँच झाला होता. फ्लिपकार्टवर कार्बन X21 ची सध्याची किंमत 5,498 रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट मिळतील. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर UNISOC SC9863 चिपसेट, अँड्रॉइड 10 ‘गो एडिशन’, 3,000mAh बॅटरी, 5MP सेल्फी कॅमेरा आणि 8MP रिअर कॅमेरा मिळतो.

 

नोकिया सी 01

नोकिया सी 01 प्लस नोकियाने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या  2GB + 16GB व्हेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे. ग्राहक अॅमेझॉन आणि नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन  खरेदी करू शकतात. नोकियाचा स्मार्टफोन Unisoc SC9863A प्रोसेसर, 5MP रियर कॅमेरा, 2MP सेल्फी कॅमेरा, 3,000mAh बॅटरी, Android 11 (Go Edition) आणि 5.45-इंच HD+ डिस्प्लेसह उपलब्ध आहे.

Check Also

आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात ८ मे रोजी येणार बाजारात

आधार हाऊसिंग फायनान्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *