Breaking News

कंगनाच्या घराचे भवितव्य दिंडोशी न्यायालयाच्या हाती उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने काल मुंबई महापालिकेने बजाविलेली नोटीस योग्य असल्याचा निकाल दिला. त्याविरोधात महापालिकेने बजाविलेली ही नोटीस रद्दबातल करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने दिंडोशी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने राणावत हीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे कंगनाच्या घराचे भवितव्य आता दिंडोशी न्यायालयाच्या हाती राहीली आहे.

खार येथील एका अपार्टमेंटमध्ये कंगना राणावत हीने दोन सदनिका घेतल्या. त्या सदनिका मुंबई महापालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय परस्पर जोडल्या. तसेच महापालिकेने मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्यात परस्पर बदल करत सदनिकेचे अंतर्गत बांधकाम केल्याबद्दल अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कंगना राणावत हीला २०१८ साली नोटीस बजावली होती. याप्रकरणी दिंडोशी न्यायालयात कंगनाने धाव घेतली. परंतु दिंडोशी न्यायालयाने मुंबई महापालिकेने बजावलेली नोटीस योग्य असल्याचा निकाल दिला. मात्र या नोटीशीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्या करीता ६ आठवड्याची मुदत कंगनाला दिली.

त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मुंबई महापालिकेची नोटीस अयोग्य असून त्यात कोणत्याही प्रकराचे नेमके भाष्य करण्यात आले नसल्याचा दावा कंगनाकडून करण्यात आला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावत दिंडोशी न्यायालयास पुढील सुणावनी करण्यास सांगितले.

यापूर्वी बांद्रा येथील कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयाने निकाल देत कंगनाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *